राजेंद्र कुमार काळे - लेख सूची

धर्मग्रंथ-दहन आंदोलने

या लेखात भारत आणि दोन प्रगत देशांतील धर्मग्रंथ-दहन आंदोलने आणि संबंधित कायद्यांचा संक्षिप्त आढावा घेऊन वस्तुस्थितीचे विश्लेषण केले आहे. यावर्षी डेन्मार्क आणि स्वीडनमधील कुराण जाळण्याच्या, आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर अश्या घटना समोर आल्या आहेत. वकील आणि उजव्या विचारसरणीचे डॅनिश राजकारणी रासमस पैलुडन यांनी २१ जानेवारी रोजी स्टॉकहोम येथील तुर्कस्तानच्या दूतावासासमोर इस्लाम आणि मुस्लिम स्थलांतराच्या …

अविनाश पाटील ह्यांच्या भाषणाचे समालोचन

डिसेंबर २०२२ च्या १८ तारखेला पुण्यातल्या गोखले सभागृहात राष्ट्रीय नास्तिक परिषद थाटात सम्पन्न झाली. परिषदेची सुरुवात अविनाश पाटील यांच्या विचारप्रवर्तक भाषणाने झाली. अविनाश हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि ब्राइट्सचे जुने स्नेही आणि सहयोगी आहेत. महाराष्ट्र अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर आपल्यातून हिरावले गेले, त्यावेळी बसलेल्या तीव्र धक्क्यातून आणि …

विश्वंभर चौधरी ह्यांच्या भाषणावरील खुलासा

विश्वंभर चौधरी यांनी ब्राइट्सच्या नास्तिक परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात “तुम्हाला जगण्याचा सांवैधानिक हक्क आहे, पण देशाच्या प्राचीन संस्कृतीला घेऊन चालावे लागेल” असे सांगून केली. उजवे लोक मुस्लिम लोकांना देतात तेवढी जगण्याची मुभा विश्वंभर यांनी आम्हा नास्तिक लोकांना दिली. अर्थातच, “हिंदुस्थान मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा”. पण आपल्या खांद्यावर मृत इतिहासाचे ओझे वाहत …